टीम इंडियाने मालिका जिंकली ! थरारक सामन्यात भारत विजयी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 8 धावांनी विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 187 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 178 रन केल्या.

विशेष बाब म्हणजे निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांच्या दमदार खेळीनंतरही वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला.

रोव्हमन पॉवेलने 36 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले, तर निकोलस पूरनने 41 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि रवी बिष्णोई यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 186 रन केले.

भारताकडून पंतने 28 बॉलमध्ये 52 आणि विराटने 41 बॉलमध्ये 52 रन केले. या विजयासोबतच भारताने तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. आता सीरिजची तिसरी टी-20 मॅच रविवारी कोलकात्यामध्येच होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe