वन डे पाठोपाठ T20 सीरिजही ३-० अशी जिंकली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या

तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला १७ धावांनी मात देत ३-० अशी मालिका जिंकली. या विजयासह भारताने टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

दरम्यान अखेरच्या मॅचमध्ये टॉस जिंकून विंडीजने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० ओव्हरमध्ये ५ बाद १८४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये ९ बाद १६७ धावा एवढीच मजल मारता आली.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

– निकाल पहिली वन डे, अहमदाबाद

– भारताचा ६ विकेट राखून विजय दुसरी वन डे, अहमदाबाद

– भारताचा ४४ धावांनी विजय तिसरी वन डे , अहमदाबाद

– भारताचा ९६ धावांनी विजय पहिली टी २०, कोलकाता

– भारताचा ६ विकेट राखून विजय दुसरी टी २०, कोलकाता

– भारताचा ८ धावांनी विजय तिसरी टी २०, कोलकाता – भारताचा १७ धावांनी विजय

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe