एसटी कर्मचारी संप प्रकरणी आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात एसटी कामगारांच्या आंदोलनात आज मंगळवारचा दिवस निर्णायक आहे.

महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीची व्यवहार्यता ठरवण्यासाठी न्यायालय नियुक्त त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात खुला होणार आहे.

गेल्या 100 दिवसांहून अधिक काळ झालं एसटी कर्मचारी संपावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.

त्यामुळे अद्याप संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

या अहावालावर आज मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. विलिनीकरणाबााबत समितीच्या अहवालात नेमक्या काय शिफारशी आहेत?

याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का? कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का?

हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे. संपचा तिढा कायम असताना आज न्यायालयात काय निर्णय होणर याकडे कामगारांबरोबरच प्रवाशांचे देखील लक्ष लागले आहे.

न्यायालयाचा निर्णय अंतिम न्यायालय याबाबत जो काही निर्णय घेईल तो आम्हाला सरकार म्हणून मान्य असेल आणि आमच्यावर बंधनकारकही असेल. – अनिल परब, परिवहनमंत्री

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe