नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटींची प्रशासकिय मंजुरी

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटी 41 लाख रुपयांची प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील जलसंधारण कामांची दुरूस्तीसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे दाखल झाले होते. अखेर मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी या सर्व प्रस्तावांना प्रशासकिय मंजूरी दिली. यामध्ये नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटी 41 लाख रुपयांची प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी
श्रीरामपूर (21 कामे 336.16 लाख रुपये),
पाथर्डी (9 कामे 165.33 लाख रुपये),
कोपरगाव ( 25 कामे 369.19 लाख रुपये),
राहुरी (8 कामे 63.043 लाख रुपये),
राहता (6 कामे 96 लाख रुपये),
शेवगांव ( 31 कामे 658.91 लाख रुपये),
नगर (33 कामे 868.89 लाख रुपये),
राहता 0 ते 250 हे (1 कामे 49.69 लाख रुपये),
कोपरगाव (3 कामे 77.8 लाख रुपये),
शेवगांव (2 कामे 96.71 लाख रुपये)
नेवासा (5 कामे 41.3 लाख रुपये),
पारनेर (23 कामे 370.1 लाख रुपये),
संगमनेर (31कामे 259.52 लाख रुपये),
अकोले (6 कामे 88.4 लाख रुपये),

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News