पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकाच रात्री एका पतसंस्थेसह सात दुकाने फोडली…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावरील व्यापारी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका पतसंस्थेसह सात दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

एकाच रात्री सात दुकाने फोडल्याने गावातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी काल पहाटे तीनच्या सुमारास काष्टी येथील अजनुज चौकातील समृध्दी सहकारी पतसंस्था त्या शेजारील साई सुपर मार्केट,

इलेक्ट्रिक गोडावून फोडून दुकानातील काही वस्तु तसेच काही रोख रक्कम तर छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार आवारातील गाळ्यातील गुरुदत्त पेंटचे दुकान फोडून दहा हजार रोख रक्कम व चांदीचे सोन्याचे क्वाईन चोरीला गेले.

तर गिप्ट गॅलरी हाऊस, ॲग्रोसेल्ससह एक मेडीकल फोडण्याचा प्रयत्न फसला. या चोरीच्या घटनेत रक्कम तर काही महागड्या वस्तु चोरीला गेल्या आहेत.

दोन वर्षे कोरोनामुळे व्यवसाय कमी त्यात चोरी झाल्यामुळे व्यावसायीक हवालदिल झाले असून एका दुकानातील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व चोरटे कैद झाले असून ते स्पस्ट दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe