पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :-  रशिया – युक्रेन युद्धाचा परिणाम पेट्रोल-डिझेल दरावर होण्याची मोठी शक्यता आहे. पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान विशेष बाब म्हणजे नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे कंपन्यांनी दरात वाढ केली नसल्याचं मानलं जात आहे.

तेल कंपन्यांनी आज लखनऊ, गुरुग्राम, जयपूर, पटनासारख्या शहरांत इंधन दरात बदल केले आहेत. परंतु मागील चार महिन्यांपासून मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्लीसारख्या महानगरांत पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल किंमत सर्वाधिक 110 रुपये प्रति लीटर जवळपास आहे.

तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर (पेट्रोल – डिझेल)

पुणे – 109.45 रुपये 92.25 रुपये
मुंबई – 109.98 रुपये 94.14 रुपये
नाशिक – 109.49 रुपये 92.29 रुपये
नागपूर – 109.71 रुपये 92.53 रुपये
अहमदनगर – 110.15 रुपये 92.92 रुपये
औरंगाबाद – 110.38 रुपये 93.14 रुपये
रत्नागिरी – 110.97 रुपये 93.68 रुपये
रायगड – 109.48 रुपये 92.25 रुपये
परभणी – 112.49 रुपये 95.17 रुपये
पालघर – 109.75 रुपये 92.51 रुपये
सांगली – 110.03 रुपये 92.83 रुपये
कोल्हापूर – 110.09 रुपये 92.89 रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe