अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपरिक पद्वतीने तेल लावण्यात आले.
नगरा व शंख ध्यवनीच्या निणादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भत्तीमय वातवरणात संपन्न झाला. नाथांच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तिमय झाले होते.

या वेळी भाविक, विश्वस्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. शुद्ध पंचमीला नाथांच्या समाधीला तेल लावण्याचा विधी असतो. कुंभाराकडून मातीचे कोळंबे व पाच घट आणले जातात, त्यास नाडा बांधून त्यामध्ये तेल टाकले जाते.
गुलाबपाणी दूध, गंगाजल , हळद, चंदन पावडर, बुक्का भस्म, असे पदार्थ कालवून नाथांच्या संजीवन समाधीला तेल लावण्याचा पांरपरिक विधी केला जातो.
तेल लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, प्रत्येक देवतांच्या उत्सवापूर्वी शुभ व धार्मिक कार्याचा प्रारंभ तेल लावण्यापासून होतो. तेल लावल्यानंतर आजपासून गुढीपाडव्यापर्यंत मढी ग्रामस्थ व्रतस्थ असतात.
देवाला तेल लावल्यानंतर मढी ग्रामस्थ आजपासून घरात गोड धोड करत नाहीत, विवाहकार्यात जाणे नाही, शेतीची कामे बंद, दाढी-कटिंग ,नवीन वस्त्र परिधान करायचे नाहीत, अशी येथे परंपरा आहे.