महत्वाची बातमी ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :-मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे, राज्यामध्ये आता पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.

पुढील २ दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी हलका तआणि मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाळा सुरु झाला असून उन्हाची झळही जाणवू लागली आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे नागरिकही मोठ्या प्रमाणावर चिंतेत आहेत. अशातच अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.

8-9 मार्च उत्तर मध्य महाराष्ट्रात व 9 मार्च लगतच्या मराठवाड्यात गारपीटची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास हवामान विभागानं सांगितलं आहे.

8-10 मार्चला महाराष्ट्र, गुजरात, पू. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाटासह, जोरदार वाऱ्यासह, हलका, मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

तर उद्या कोकणासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News