अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:-“ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे.
मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे,” असे राऊत म्हणाले. केंद्रातील तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

त्यांच्या घरावर छापा मारण्यात येत आहे. मात्र, भाजपच्या एकाही नेत्यावर असा छापा मारलेला नाही. ED आणि IT च्या धाडी आमच्याकडेच का? भाजपचे लोकं रस्त्यावर कटोरा घेऊन फिरत आहेत का, असा सवाल राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे.
तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. अशी टीका त्यांनी केली आहे. ज्या ईडीला तुम्ही राजकीय विरोधकांच्या मागे लावली आहे.
ईडीचे लोक बिल्डर डेव्हलपर यांना घाबरते. पैसे लुबाडले जातात, ही माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. जितेंद्र नवलानी याने 100हून अधिक बिल्डर डेव्हलपर यांच्याकडून धमकावून पैसे लुबाडले आहेत,
असा आरोप संजय राऊत यांनी केला. नवलानी हे इडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत 2017 मध्ये इडी ने दिवान हाऊसिंग सोसायटी ची चौकशी केली तेव्हा नवलानी यांनी 10 कोटी यांना 7 कंपनीत भोसले यांनी पैसे पाठवले.
दिल्ली, मुंबईमधून हे रॅकेट चालवलं जातं आहे. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहोत. यात भाजपचे लोक सहभागी झाले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.