“दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार मलिकांचा राजीनामा घेत नाही, सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाहीये”; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

Published on -

मुंबई : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडी अटक केली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा अजून घेण्यात आला नाही. भाजपने (BJP) आज मुंबईत भव्य मोर्चा काढत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोर्चापूर्वी महाविकास आघडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला जात नाही हे माध्यमांना सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीये. त्यांना पाठिशी घालत आहे. दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे.

यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) २७ महिन्यात पूजा चव्हाणमध्ये संजय राठोडांचा राजीनामा झाला. केवळ जनतेने आवाज उठवला आणि संवेदनशीलता दाखवून राजीनामा घेतला गेला. अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) बाबतीत हायकोर्टानं सीबीआय चौकशीचा आदेश दिला.

त्यांचाही राजीनामा घेतला गेला. मात्र नवाब मलिकांच्या बाबतीत असं का झालं नाही? नवाब मलिकांना कोठडी दिली तेव्हा दिल्लीचं नाव घेतलं गेलं. पण कोर्टानं कोठडी दिली.

दाऊदच्या दबावाला दबून राज्य करणाऱ्यांविरोधात हा संघर्ष आहे. नवाब मलिकाचा पुतळा जाळणं, राजीनाम्याची मागणी करणं, यासाठी आंदोलनं झाले. विधानसभा सुरु असल्यामुळे एवढा मोठा आंदोलन सुरु आहे.

ज्यांनी राजीनामा घ्यायचा असतो, ते पवार साहेब आणि ज्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा घ्यायचा असतो, ते पवार साहेब या दोघांना इशारा देण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News