अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- सहलीसाठी वडिलांनी दोन हजार रुपये न दिल्याने 19 वर्षीय युवकाने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
वडिलांनी पैसे न दिल्याने रागाविलेला 19 वर्षीय युवक चार दिवसांपासून घरातून निघून गेला होता. आज दुपारी या मृत तरुणाचा मृतदेह विहिरीत बुडालेल्या अवस्थेत आढळला.
पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे आज सकाळी ही घटना उघडकीस आली. वडिलांशी वाद झाल्याने संतापाच्या भरात त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
सतीश जगन्नाथ घुले (वय 19 वर्ष) हे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मागील चार दिवसांपूर्वी सतीशने वडिलांकडे सहलीसाठी दोन हजार रुपये मागितले होते. पैसे न दिल्याने तो रागाच्या भरात घरातून निघून गेला होता.
आज सकाळी आठ वाजता काळेवाडी येथील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.