अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Maharashtra News :- ओडिशाच्या खुर्द जिल्ह्यातील बाणापूर इथं बिजू जनता दलाचे आमदार प्रशांत जगदेव यांच्या वाहनाने 22 लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे.
यामध्ये 7 पोलिसांसह 22 जण जखमी झाली आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. दरम्यान, कारने लोकांना चेंगरल्यामुळे संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली आहे.

या मारहाणीत आमदार चांगलाच जखमी झाला असून त्याच्यावर तसेच जखमी माणसांवर उपचार सुरु आहेत. बाणापूरमध्ये ब्लॉक अध्यक्षाची निवडणूक सुरू होती. त्याचवेळी 500 ते 700 लोक एकत्र जमले होते.
याठिकाणी पोलिसांची तुकडीही तैनात होती. मात्र जगमोहन यांनी मागचा पुढचा विचार न करता गर्दीत कार घुसवली. त्यानंतर संतप्त जमावाने आमदार जगदेव यांच्यावर हल्ला केला.
तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले.
सध्या जखमी लोकांना तसेच आमदार जगदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.