अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे.
वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वार्यावर सोडले.

आपण 25 वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा सवाल करतांनाच नदी मध्ये संगमनेर मधील सांडपाणी, आपल्या कारखान्याचे दूषित पाणी सोडून ते पाणी जनलेला देता हाच आपला विकास का? अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हेवाडी येथे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना साधन साहित्य वितरण कार्यक्रमात आ. विखे यांनी प्रदूषित पाण्यावरून टिकेची झोड उठवली.
याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ नेते बापुसाहेब गुळवे, पंचायत समितीचे सदस्य निवृत्ती सांगळे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात जनतेला मोफत धान्य मोफत,
लसीकरण त्याचबरोबर विविध योजना सुरु करून जनतेला आधार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व नेता ठरले आहेत. श्रीमंत राष्ट्रांना जे जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी शक्य करून दाखविले असेही आ. विखे पाटील यांनी सांगितले