रत्नागिरी: भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधून खासदार होतील, असा टोलाही त्यांनी राऊतांवर लगावला आहे.
निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. ते यावेळी म्हणाले की, संजय राऊत यांना किती सीरियस घ्यायचे हे आता पत्रकारांनी ठरवायला हवे.

त्यांनी आजवर किती विषय तडीस नेले हे सांगावे. राऊत हा शंभर टक्के पवारांचा माणूस आहे. ते पगार सामनाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात.असा आरोप राणेंनी यावेळी राऊतांवर केला आहे. तसेच यावेळी पुढे ते म्हणाले की, राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही.
दरम्यान, शरद पवारांवर संशय घेत, शरद पवारच दाऊदचा पहिला माणूस असल्याचा मला संशय आहे. महाराष्ट्रात संशय देखील घेऊ शकत नाही का, अनिल देशमुखांना अटक होण्याआधीच त्यांचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिक जेलमध्ये आहेत, तरी त्यांचा राजीनामा का नाही. मलिक पवारांचे कोण लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा मात्र मी गप्प बसणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.