अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने शाळेत घुसून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी येथे घडली आहे.
या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वडगावशेरी येथील एका शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एक मुलगा जबरदस्तीने शाळेच्या आवारात आला.
त्यानंतर त्याने एका मुलीवर चाकूने सपासप वार केले.त्यानंतर आरोपी तरुण पसार झाला. या घटनेत ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणीवर उपचार सुरू आहे. सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारे पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.