अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- मुलींनो, शिकून मोठे व्हा. आई-वडिलांचे नाव कमवा. जर कोणी त्रास दिला, तर त्याला सोडू नका. काही अडचण आल्यास आम्हाला कळवा. आम्ही त्याचा बंदोबस्त करू, असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिले.
भारतीय जैन संघटनेच्या वतीने २५ व २६ डिसेंबरला स्मार्ट गर्ल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन डॉ. सुधा कांकरिया व राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात १८० मुलींनी सहभाग घेतला. कोठारी यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे समन्वयक रत्नाकर महाजन, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतिलाल कोठारी, विश्वदर्शनचे गुलाबराव जाभळे, प्रवीण बलदोटा, राजेंद्र गुंदेचा या वेळी उपस्थित होते. महाजन यांनी प्रत्येक मुलींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल ताथेड, प्रफुल्ल सोळंकी, मनोज दुगड, गौतम बाफना, गणेश भळगट, पवन कांकरिया, आनंद गुगळे यांनी केले.