अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- आत्महत्या केलेल्या एका विवाहितेच्या जळत्या चितेजवळच तिच्या प्रियकराचा निघृण खून करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे घडली.
आधी तिच्या आत्महत्येसंबंधी दहा जणांविरूद्ध तर नंतर प्रियकराच्या खुनाबद्दल तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदल्या दिवशी विवाहितेला अग्नी देऊन घरी परतलेले नातेवाईक दुसऱ्या दिवशी स्मशानात आले, तेव्हा अंत्यसंस्कार केलेल्या ओट्याजवळच तिच्या प्रियकराचा मृतदेह पडलेला आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी आता वेगळा गुन्हा दाखल झाला आहे.
तिच्या नातेवाईकांनी सूडापोटी त्याचा खून केल्याचा आरोप आहे. डोळासणे येथील एका ३१ वर्षीय विवाहित महिलेने १४ मार्चला विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती.
तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून दहा जणांविरूद्ध गुन्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर डोळासणे येथील स्मशानात मृत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी अंत्यस्काराच्या ओट्याजवळ त्यांना सागर रघुनाथ भालेराव याचा मृतदेह आढळून आला. भालेराव याला स्मशानातील लोखंडी अँगलवर आपटण्यात आले, त्यानंतर त्याला काठ्यांनी बेदम मारहाण करुन दगडाने मारुन त्याचे पाय मोडण्यात आल्याचे आढळून आले.
याप्रकरणी मृत भालेराव याचे वडील रघुनाथ भिकाजी भालेराव यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राजू सीताराम क्षीरसागर, शिवनाथ सीताराम क्षीरसागर, गणेश सीताराम क्षीरसागर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.