अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- तालुक्यातील अशोक नगर येथील मयुरी नंदू पळसकर (वय १४) या युवतीने शुक्रवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत सूरज अण्णासाहेब गजभीव (वय ३८) अशोक नगर श्रीरामपूर यांनी पोलिसात खबर दिली. मयुरी हिने आपल्या राहत्या घराचे छताचे लोखंडी पाइपला ओढणीचे साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण नेमके समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे करीत आहेत.