अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यातील वाढीव उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधान परिषद सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखाना क्षेत्रातील ऊस गाळप केल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना कारखान्याला दिल्या आहेत.
तर ऊस गाळप हंगामा शेवटच्या टप्प्यात आला असून अजूनही उसाचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे आपला ऊस जाईल की नाही. याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
नेहमीचे बिघडलेले साखर कारखान्याचे ऊस गाळपा बद्दल चे गणित आणि वाढीव क्षेत्र त्यामुळे उसाचा प्रश्न चांगलाच पेटला. मराठवाडा विभागात तब्बल 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे.
असे असतानाही मराठवाड्यातील लातूर, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे. अनेकांनी पहिल्यांदाच ऊस लावला आहे, त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
यामुळे ज्यांना पाणी उपलब्ध होते त्यांनी अधिकचे पैसे मिळतील म्हणून ऊस लावला परिणाम ऊस क्षेत्रात वाढ झाली. मराठवाड्यातील तब्बल 36 साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे.
असे असतानाही ऊस शेतातच असून आता उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचे गाळप हे सुरु असून मे अखेरपर्यंत सुरुच राहणार असल्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा नेहेमी आघाडीवर असताना आता मात्र मराठवाडा विभागात ऊसाचे गाळपही वाढले आहे. यामुळे अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.