Farming Buisness Idea : अननस शेती करा प्रति हेक्टर ३ लाखांपेक्षा जास्त पैसे कमवा !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 ananas sheti information :- अननस हे फळ पोषक तत्वांनी आणि औषधी गुणधर्माने समृद्ध असे फळ आहे.अननसाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळू शकतो.

परंतु माहितीअभावी फार कमी शेतकरी अननस शेती करतात.अननस हे पोटाच्या आजारावर रामबाण उपाय म्हणून काम करते.अननस हे एक फळ आहे जे तुम्ही नेहमी ताजे चिरून खाऊ शकता.

अननस उत्पादक राज्य :

1. आसाम

2. मिझोराम

3. मेघालय

4. त्रिपुरा

5.मध्य प्रदेश

6.छत्तीसगढ

7.पश्चिम बंगाल

8.केरळ

अननस पिकाच्या लागवडीसाठी योग्य हवामान : अननस पिकाच्या लागवडीसाठी तापमान हे 15 ते 32 सेंटीग्रेड योग्य आसते.तर यासाठी पाऊस 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस लागतो.

अननस लागवडीसाठी उपयुक्त माती : मातीचा पीएच मुल्य हे 6 पेक्षा जास्त आसले पाहिजे. व अननसाठी फक्त अंकुरित मातीची निवड करावी. दलदली युक्त व पाणी साचलेला जमिनीत अननसाची लागवड करू नये.

शेतीची मशागत :

1.अननसाची लागवड करण्यापूर्वी शेतातील तण नष्ट करा आणि माती उलटी करून उन्हाळ्यात चांगली नांगरणी करून घ्यावी.

2. या जमिनीत कुजलेले शेणखत टाकून जमिनीत चांगले मिसळण्यासाठी 1- 2 वेळा नांगरणी करून घ्यावी.

3. नांगरलेली जमीन रोटाव्हेटर मारून समतल करून घ्यावी.

अननस लागवडीची वेळ आणि पद्धत : 1.अननस लागवडीसाठी पावसाळा हा सर्वात योग्य ऋतू आहे.

2. सिंचनाच्या सुविधा पुरेशी असल्यास जानेवारी ते मार्च आणि मे ते ऑगस्ट दरम्यान ही लागवड करता येते.

3.अननसाचे रोपण त्याच्या पेनपासून म्हणजेच फळाच्या देठापासून केले जाते .यासाठी निरोगी फळ पेन वापरा.

अननसाच्या प्रगत जाती

1. राणी

2.रॅड स्पॅनिश

3.मॉरिशस

4.जायंट प्र.  या जाती आहेत.

अननस सिंचन आणि खत व्यवस्थापन : अननसाचा रोपांसाठी पुरेसा ओलाव्याची गरज असते. तर मंद प्रवाहने झाडाला पाणी द्यावे लागते. त्यामुळे झाडांची मुळे मातीपासून निसटत नाहीत. तर 15 दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते.

अननस वाढीसाठी खत व्यवस्थापनात लागवडीपूर्वी टाकलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी काम करते.तर वाढीच्या वेळी योग्य प्रमाणात युरिया ही द्या.

रासायनिक खत म्हणून 680 किलो अमोनियम सल्फेट, 340 किलो स्फुरद आणि 680 किलो पोटॅश प्रति हेक्‍टरी वर्षातून दोनदा दिले पाहिजे.

रोग आणि त्याचे नियंत्रण अननसा वरील रोग टाळण्यासाठी रोग नियंत्रण महत्त्वाचे असते. त्यासाठी पिकातील तण काढून घेऊन 2-3 वेळा खुरपणी करून घ्यावी तणामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते.

अननसाच्या लागवडीमध्ये आढळणाऱ्या कीटकांमध्ये, अननस पावडरी बग्स, स्लग कीटक प्रमुख आहेत.तर त्या साठी लावणीपूर्वी पेन (स्टेम) आल्ड्रिनच्या द्रावणात बुडवून त्यावर उपचार करा.

जमिनीच्या वरच्या भागात प्रादुर्भाव झाल्यास डायझिनन किंवा मोनोक्रोटोफॉसचे ०.५% द्रावण पानांवर फवार करावी.

अननस लागवड खर्च आणि कमाई : अननसातील एकूण खर्च हा प्रति हेक्टर 2 लाख रुपये खर्च येते. यातून 3 ते 4 टन अननसाचे उत्पादन होते. एक किलो फळाची किंमत 150 ते 200 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

भारतात आता अननस लागवड कमी प्रमाणात होत आहे. कमी उत्पादनामुळे अननसाला बाजारात फारशी स्पर्धा नाही. प्रक्रिया उद्योगांमध्येही याला मोठी मागणी आहे. अननसाचा उपयोग रस, कॅन केलेला काप इत्यादी स्वरूपात केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe