अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिकमधील भाजप नगरसेविका शांताताई हिरे यांचा विषारी औषध प्राषाण केल्याने मृत्यू झाला आहे. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय.
फुलेनगर परिसरातील प्रभाग 4मधील त्या नगरसेविका होत्या. त्यांच्या अशा जाण्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली आहे.
शांताताई हिरे या त्यांच्या प्रभागातील उत्तम नगरसेविका होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून त्या अनेक आजारांनी ग्रासल्या होत्या.
शांताताई यांच्या चोख कामाची संपूर्ण नाशिकमध्ये चर्चा असायची सभागृहामध्ये त्या कायम नागरिकांचे प्रश्न चोख मांडायच्या. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
प्रत्येक नागरिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. काम चांगलं असतानाही त्या आजारामुळे कंटाळल्या होत्या. अखेर या सगळ्या आजाराला थांबवण्यासाठी त्यांनी आत्महत्या हा शेवटचा पर्याय निवडला आणि आयुष्य संपवलं.