दरोडेखोर बनले ऊस तोडणी कामगार आणि पुढे…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News :-अतिरिक्त ऊस आणि मजुरांचा तुटवडा यामुळे ऊस तोडणी मजुरांना मागणी वाढली. या संधीचा फायदा उठवत एरवी चोऱ्या-माऱ्यांचे गुन्हे करणाऱ्यांनी ऊस तोडणी मजुरांची टोळी तयार करून सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीचे काम केले.

मात्र, ते करीत असताना रेकी करून एका बागायतदाराच्या वस्तीवरच दरोडा टाकला. वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर) हा या टोळीचा म्होरक्या आहे.

या टोळीने बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) जवळील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे यांचा खून करून त्यांच्या घरातून ७५ हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला.

या टोळाचा मोऱ्हक्या काळे याने उस्मानाबाद जिल्ह्यातील नातेवाईकांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी टोळीतील आठपैकी सहा जणांना अटक केली आहे.

या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी ऊस तोडणी मजूर म्हणून काम करतात. ते सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी दर्गनहळ्ळी परिसरात ऊसतोड केली.

त्यावेळीच त्यांनी पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती तपासाच उघड झाली आहे. वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर), अजयदेवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा), ज्ञानेश्वर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) आणि वाहनचालक संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) यांना अटक केली आहे.

फरारी आरोपी अक्षय काळे (रा. पिंपळगाव, ता. जामखेड आणि अनुज उर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) यांचा शोध सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News