अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- चित्रपट अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग आणि हुजेफा क्युजर या चौघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली आहे.
तोफखाना पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेऊन ती मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. एका कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याची ही तक्रार आहे.
नगर शहरातील ख्रिश्चन समाजाचे सिसिल भक्त यांनी ही तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी समाजाच्या ग्रंथातील एका शब्दाचा चुकीचा वापर केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या कार्यक्रमाचा निर्माता हुजेफा क्युजर याने संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर प्रसारित केला, असेही तक्रारीत म्हटले आहे.