पाथर्डी : डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचे मंगळवारी शहरात पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डॉ. विखे यांचा निषेध केला.
मंगळवारी (१२ मार्च) डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी विखे यांच्या निषेधाच्या घोषणा देत फटाके फोडले.
या वेळी बोलताना नगरसेवक बंडू बोरुडे म्हणाले की, ‘विखे कुटुंबाने काँग्रेसच्या जीवावर अनेक पदे मिळवली. मात्र, ते कधीही काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले नाहीत.
विखे यांनी शिवसेनेशीही घरोबा केला होता. मात्र, मंत्रिपद मिळूनही त्यांनी शेवटी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
स्व. राजीव गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा विरोध करण्याचे काम विखे यांनी केले. विरोधी पक्षनेतेपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विखे घराण्यात असूनही त्यांनी भाजपत प्रवेश केला.
तरीही भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची मदत घेत विखे यांचा आम्ही पराभव करू.’