Sharad Pawar : ‘समाजात विद्वेष पसरवायला मदत… पंतप्रधानांकडूनही त्यावर भाष्य केलं जातं’; द काश्मिर फाईल्सवरून शरद पवारांची मोदींवर टीका

Content Team
Published:

पुणे : द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाचे (Movie) भाजपकडून (BJP) जोरदार समर्थन करण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या चित्रपटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या भाजपवर सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांनी या चित्रपटावर आणि भाजपवरही सडकून टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले, विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, टीका करताना विद्वेष नसायला हवा. मात्र अलिकडे तेच अधिक पाहायला मिळत आहे. राजकारण चुकीच्या दिशेला जात आहे. काश्मिरमधील एक घटक निघून गेला.

त्यावर एक चित्रपट आला, काँग्रेसवर टीका झाली. मात्र, या चित्रपटामुळे मनं जोडण्याऐवजी मनं तोडण्याचं काम झालं. समाजात विद्वेष पसरवायला मदत केली जाते.

पंतप्रधानांकडूनही त्यावर भाष्य केलं जातं. या चित्रपटाच्या माध्यमातून गांधींवर टीका-टिप्पणी केली जाते असेही पवार म्हणाले आहेत.

काश्मिरमधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती. तर व्ही. पी. सिंग यांचं सरकार होतं. भाजपचं त्यांना सहकार्य होतं. म्हणजेच भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले, असा दावाही पवारांनी केला आहे.

मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे. गांधी, नेहरुंनी देशाला दिशा दिली, नुसते स्वातंत्र्य दिले नाही.

देशाला महत्व देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. देशाला एकसंध ठेवायचं आहे असेही मत पवारांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe