अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;- येथील एका विद्यार्थिनींच्या वसतीगृहावर रहाणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहातीलच नराधमाने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेने जिल्ह्यात पालक वर्गात खळबळ उडाली असून आजही विद्यार्थिनी समाजात सुरक्षित नसल्याचे या घटनांवरुन समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल परिसरात
७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ . ३० च्या सुमारास विद्यार्थिनीला हात पकडून रुमध्ये घेवून जावून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने महेश प्रभाकर चाचर याने विनयभंग करुन बलात्कार केला.
व तू ओरड ली तर तुला मारुन टाकील व कोणाला काही बोलली तर जिवे मारील , अशी धमकी दिली.
पिडीत १३ वर्षाच्या विद्यार्थिनीने राहरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी महेश प्रभाकर चाचर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
संतापजनक गोष्ट म्हणजे आरोपी महेश चाचर हा येथील विद्यार्थिनींच्या वसतीगृहावर देखरेख म्हणून काम करतो . रक्षकच भक्षक झाल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे.
मुली वसतीगृहात देखील सुरक्षित नसल्याचे समोर आल्याने पालक वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.