अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Maharashtra news :- तब्बल दोन वर्षांपासून लागू करण्यात आलेले कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रीमंडळाची बैठक मुंबईत सुरू आहे.
त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.

गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा रमजान उत्सहात साजरा करा बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा.’ एक एप्रिलपासून कोरोनाचे मास्क वगळता सर्व निर्णय मागे घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या होत्या.
त्यामुळे राज्यात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले होते. आता राज्य सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून राज्यात कोरोनासंबंधीचे कोणतेही नियम लागू राहणार नाहीत.p













