अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तालुक्यातील गणेगाव येथील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीने रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास दिलेल्या जबाबावरून शिक्षक तथा वसतिगृह प्रमुख महेश प्रभाकर चाचर याच्याविरूध्द बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
७ ऑक्टोबर २०१९च्या रात्री ११ ते १२ वाजता, तसेच आठ दिवसांच्या अंतराने पुन्हा दोन वेळा संबंधित शिक्षकाकडून मुलीवर अत्याचार झाले.
मुलींच्या वसतिगृहातील खोलीत जाऊन, तसेच बाथरूममध्ये ओढत नेऊन शिक्षकाने अत्याचार केल्याचे जबाबात म्हटले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी शिक्षकाने मुलीला दिली होती.
श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख हे सोमवारी दिवसभर संबंधित शाळेत ठाण मांडून होते. या घटनेनंतर शिक्षक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.