अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- भरधाव टँकरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्रकार चौकात घडली.
कमलेश ऊर्फ अभिजित अनिल पटवा (३२, भुतकरवाडी) असे मृताचे नाव आहे. कमलेश यांचे मार्केटयार्डात अरिहंत सेल्स मशिनरी – हार्ड वेअर हे स्पेअर पार्टसचे दुकान आहे.
सोमवारी दुपारी ते दुचाकीवरून पत्रकार चौकातून सावेडीकडे चालले होते. तारकपूर रस्त्याने पत्रकार चौकात आल्यानंतर ते मनमाड रस्त्याकडे वळाले.
चौकातून वळण घेत असतानाच जिल्हा रुग्णालयाकडून येणाऱ्या टँकरखाली ते चिरडले गेले. टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघात होताच चाैकात मोठी गर्दी झाली.
शहर वाहतूक नियंत्रण शाखा व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताचे दृश्य शहर वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
अपघातात मरण पावलेले कमलेश हे सोमवारी दुपारी पत्रकार चौकातून सावेडीकडे चालले होते. पत्रकार चौकातून वळण घेत असताना ते मोबाइलवर बोलत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये दिसते.
मोबाइलवर बोलण्याच्या नादात त्यांना भरधाव वेगात येणाऱ्या टँकरचा अंदाज आला नाही,आणि टँकरची धडक बसल्यानंतर मागच्या चाकखाली चिरडून कमलेश अनिल पटवा यांचा मृत्यू झाला.