Nirmala Sitharaman : इंधन दरवाढीबाबत अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या रशियाकडून…

Content Team
Published:

दिल्ली : देशात सध्या महागाईची क्रेझ सुरु आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी इंधन दरवाढीबाबत (Fuel price hike) मोठे भाष्य केले आहे.

रशिया आणि युक्रेन चे युद्ध (Russia ukraine war) सुरु आहे. युक्रेन कोणत्याही परिस्थिती युद्धातून माघार घेईल तयार नाही. तर रशिया ही त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) दरावर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International market) युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने देशात इंधनाच्या किमती वाढत आहे.

रशिया हा कच्चे तेल पुरवणाऱ्यांपैकी एक प्रमुख देश आहे. भारत हा रशियाकडून (Russia) कच्चे तेल आयात करत आहे. मात्र रशियावर अनेक राष्ट्रांकडून दबाव आणण्यात येत आहे. तसेच भारतावरही दबाव आणण्यात येत आहे.

याच मुद्यावर निर्मला सितारमण यांनी भाष्य केले आहे. अमेरिका आणि यूरोपीयन राष्ट्रांचा दबाव असला तरी देखील भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात (Import) सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्टपणे निर्मला सितारमण यांनी सांगितले आहे.

रशियाकडून युरोपियन राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. मात्र युद्ध सुरु झाल्यापासून अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनी रशियाकडून कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करण्यास नकार दिला आहे.

भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे जर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे चालू ठेले तर भारतातील पट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात.

रशियाकडून भारताला प्रति बॅरल 35 डॉलर डिस्काउंटची ऑफर देण्यात आली आहे. भारत हा कच्च्या तेलाचा तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा आयातदार देश असून, आपल्याला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात इतर देशांवर अवलंबून राहावे लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe