अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यासोबत अजित पवारांच्या नावे तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा अनोखा विक्रमही रचला गेला आहे.
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला आहे.
अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत अजित पवारांनी दुसर्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली.
विधासनभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सरकार आणण्याच्या वाटाघाटी या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ करीत असतानाच अजित पवारांनी बंड पुकारले आणि भाजपला साथ देत उपमुख्यमंत्री झाले. त्यावरून राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांत प्रचंड खल झाला.
एक महिन्यापूर्वी त्यांनी याच पदासाठी राज भवनात शपथ घेतली होती. पण, त्यावेळी पक्ष वेगळा होता आज, सर्वांसमवेत भव्य सोहळ्यात त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. त्याच राज्यपाल कोशियारी यांनी पुन्हा अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यावेळचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.