अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- शासनाने शेतकरी बांधवांना शेतमालाची विक्री हमीभावात करता यावी यासाठी हमीभाव केंद्रांची (Guarantee Centers) उभारणी केली आहे.
सध्या रब्बी हंगामातील (Rabbi Season) हरभरा हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी नेला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) हरभरा उत्पादक शेतकरी (Farmers producing gram) देखील हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्राकडे वळले आहेत.
मात्र बुलढाणा जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर बारदानाचा तुटवडा जाणवत असल्याने हमीभाव केंद्रांवर हरभरा (Gram Crop) खरेदी प्रभावित झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी बारदान नसल्यामुळे तूर्तास बंद ठेवली गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात हमीभाव खरेदी केंद्रावर बारदाना ची आवश्यकता आहे, बारदानाअभावी जिल्ह्यात हरभरा खरेदी जणू काही ठप्प झाली आहे.
हरभऱ्याची विक्री शेतकरी बांधवांना किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी मध्ये करता यावी यासाठी शासनाने शासकीय हमीभाव केंद्रे सुरु केली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातही हरभरा खरेदी करण्यासाठी शासनाने नाफेडची हमीभाव केंद्र सुरू केले आहेत. मध्यंतरी मात्र या हमीभाव केंद्रात शेतमाल ठेवण्यासाठी बारदानाची कमतरता भासत असल्याने हरभरा खरेदी प्रभावित झाली होती.
यामुळे जिल्हा पणन महामंडळाने वरिष्ठांकडे बारदान उपलब्ध करून द्यावे म्हणून पाठपुरावा केला होता. पणन महामंडळाने पाठपुरावा केल्यानंतर सदर हमीभाव केंद्रात 50000 बारदानाची सोय करून देण्यात आली.
हाती आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यासाठी सुमारे पाच लाख बारदानाची आवश्यकता असते. असे असले तरी अद्याप पर्यंत जिल्ह्यासाठी पावणे दोन लाख बारदान उपलब्ध करून दिले गेले आहेत.
यामुळे जिल्ह्याला आवश्यक बारदान उपलब्ध न झाल्यास खरेदी प्रभावित होण्याची भीती निर्माण होऊ शकते. पणन विभागाच्या अंतर्गत आत्तापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात 62 हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.
जिल्ह्याला अजून दोन लाख बारदान लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी पाच लाख बारदानासाठी आता मागणी करण्यात आली आहे.
मात्र मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत असल्याने संथ गतीने बारदानाची पूर्तता केली जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बुलढाणा जिल्ह्यात अठरा हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आपली नोंदणी केली आहे.
18000 शेतकऱ्यांपैकी सुमारे पावणेचार हजार शेतकऱ्यांची हरभरा खरेदी झाली आहे. या पावणेचार हजार शेतकऱ्यांकडून सुमारे 62 हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.
अजूनही 14000 हून अधिक हरभरा उत्पादक शेतकरी हरभरा विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची हरभरा खरेदी करण्यासाठी आता बारदानाची नितांत आवश्यकता आहे.
सध्या हमीभाव केंद्रावर बारदान उपलब्ध करून दिले आहेत मात्र असे असले तरी अजूनही बारदानाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला नाही, यामुळे हरभरा खरेदी प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.