ऊस तोडायला 10 हजार, जेवायला मटण; तरीही ऊस फडातच, म्हणुन शेतकरी म्हणतो ऊस नको रे बाबा……

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या दीड-दोन महिन्यापासून राज्यात एकाच चर्चेस मोठे उधाण आले आहे ती म्हणजे अतिरिक्त उसाबाबत (Extra Sugarcane).

उसाचा हंगाम (Sugarcane crushing Season) आता अंतिम टप्प्यात असताना देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवरच आहे.

एवढेच नाही तर काही कारखानदारांनी आपल्या कारखान्यांची दरवाजे देखील बंद करायला सुरुवात केली आहे यामुळे अतिरिक्त उसाचे करायचे काय असा प्रश्न आता शेतकरी बांधवांपुढे उभा राहिला आहे.

अतिरिक्त उसाच्या मुद्द्यावर ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, गाळप हंगाम हा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी अजूनही 15 टक्के ऊस हा फडातच आहे.

यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. अधिक काळ ऊस फडात राहत असल्याने उसाच्या वजनात मोठी घट देखील होत आहे. एकंदरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

यादरम्यान, अखिल भारतीय किसान सभेचे (All India Kisan Sabha) शिष्टमंडळ पुणे येथे दाखल झाले होते. या शिष्टमंडळाने (Kisan Sabha Delegation) साखर आयुक्तालय शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांची भेट घेतली होती.

यावेळी किसान सभेच्या शिष्टमंडळाने ऊस गाळप करण्यासाठी कारखानदारांनी टंगळमंगळ केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 500 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.

निश्चितच आता साखर आयुक्तालय याबाबत काय निर्णय घेतात हे विशेष बघण्यासारखं राहणार आहे. या व्यतिरिक्त अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने अजूनही काही मागण्या यावेळी केल्या त्यापैकी प्रमुख म्हणजे पिक कर्ज संदर्भातली होती. शिष्टमंडळाच्या मते, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्जाची वेळेवर परतफेड होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी थकबाकीदार बनत आहेत.

यामुळे साहजिकच शासनाच्या कर्ज व्याजमाफी पासून सदर शेतकरी वंचित राहू लागला आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या तोट्यात सापडतात.

म्हणून शेतकरी थकबाकीदार होणार नाही या पद्धतीने ऊस गाळप आणि पेमेंट निश्चित करावे अशी मागणी यावेळी केली गेली. साखर आयुक्तालय शेखर गायकवाड यांनी देखील शिष्टमंडळाला सांगितले की, या हंगामात कोणत्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी फडात राहणार नाही.

साखर आयुक्तालय यांचे आश्‍वासन मिळाल्यामुळे निश्चितच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी यापेक्षाही अधिक आहेत.

ऊस तोडणी करण्यासाठी मुकादम ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून एकरी दहा हजार रुपये एवढी रक्कम मागत आहेत. विशेष म्हणजे वाहतुकीसाठी शेतकरी बांधवांना पैसे मोजावे लागत आहेत, कारण की वाहतूक करणारे प्रति गाडी एक हजार रुपयांची मागणी करत आहेत.

या सर्व परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी पुरता भरडला जात असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे पुढल्या वर्षी ऊस नको रे बाबा…..! असे ऊस उत्पादक शेतकरी म्हणत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe