Farming Business Idea : सेंद्रिय राजमाची शेती कशी करावी लागवडी दरम्यान कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Krushi news :- राजमासोबत भात खाण्याची मजाच वेगळी असते.राजमा हा आरोग्यसाठी ही चांगला असतो. राजमा लागवडीमुळे  शेतकरी आर्थिक नफा देखील मिळवू शकतो.

राजमा  हे कडधान्य पीक आहे. यामध्ये अनेक पौष्टिक गुण असतात. त्यामुळे याला चवीचा राजा देखील म्हटले जाते.यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. राजमा जेवणाची चव वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

राजमाच्या लागवडीसाठी आवश्यक हवामान राजमाला थंड हवामान हवे आहे. राजमाची लागवड डोंगराळ भागात केली जाते , परंतु त्याच्या नवीन वाणांच्या विकासानंतर, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातही ते यशस्वीपणे घेतले जाते.

लागवड वेळ राजमा हे डोंगराळ भागात खरिपाचे पीक आहे, परंतु रब्बी हंगामात मैदानी भागातही त्याची लागवड केली जाते. सिंचनाची सोय असताना फेब्रुवारीमध्ये पेरणीही केली जाते.

राजमा शेतीसाठी आवश्यक माती हलक्या चिकणमातीपासून भारी चिकणमातीपर्यंत राजमाची लागवड करता येते. त्याची लागवड करताना शेणखत आणि कंपोस्ट मातीत मिसळावे. 6-7 pH मूल्य असलेली माती लागवडीसाठी चांगली असते.

राजमा लागवडीसाठी तापमान राजमाच्या चांगल्या उत्पादनासाठी 10 ते 27 अंश सेंटीग्रेड तापमान आवश्यक आहे. खरीप हंगामात राजमाचे उत्पादन चांगले येते.

खत व्यवस्थापन राजमाला 120 किलो नायट्रोजन, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी लागते. यामध्ये अर्धा नत्र आणि पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धा नत्र उभ्या पिकात द्यावा.

राजमाचे सुधारित वाण

राजमाचे सुधारित वाण पीडीआर -१४,

मालवीय -१३७, बीएल -६३, अंबर,

आयआयपीआर ९६-४, उत्कर्ष,

आयआयपीआर ९८-५, एचपीआर -३५,

बीएल -६३  ही आहेत.

पीक उत्पादन राजमा हे पीक 90 ते 115 दिवसांत तयार होते. त्याची प्रति हेक्टर उत्पादकता 12 ते 30 क्विंटल पर्यंत असते.

राजमा लागवडीतील खर्च  आणि कमाई शेतकर्याने जर प्रगत पद्धतीचा वापर करून  राजमाची लागवड केल्यास त्यांना खूप फायदा होऊ शकतो. राजमा लागवडीसाठी कार्यक्षम पीक व्यवस्थापन आवश्यक आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत, राजमा पिकासाठी  प्रति हेक्टर 50-60 हजार रुपये खर्च येतो .

राजमा बाजारात धान्य आणि डाळींच्या रूपात विकला जातो. बाजारात डाळींची किंमत 120-140 रुपये आणि धान्याची किंमत 100-120 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. त्यानुसार शेतकरी बांधवांना एका हेक्टरपासून दोन -तीन लाखांपर्यंत सहज उत्पन्न मिळू शकते .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe