अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Chief Minister Uddhav Thackeray : घरात बसून कारभार पाहणारे मुख्यमंत्री अशी विरोधकांकडून सतत टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घराबाहेर पडून मंत्रालया गाठलं.
तिथं विविध विभागांना भेटी देत कामकाजाची पाहणी केली. मंत्रालयात पोहोचल्यावर प्रथम मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केलं. त्यानंतर विविध विभागांना भेट दिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
त्यांना कामाबद्दल सूचना केला. प्रथमच मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात आल्याचं पाहून कर्मचाऱ्यांनीही त्यांचं स्वागत केलं. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ संजय चहांदे यांच्यासह अन्य अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत होते.
प्रथम कोरोनाचे संकट आणि त्यानंतर मानेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री प्रदीर्घकाळ घरूनच कामकाज चालवत होते. यावरून त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली.
त्याची तमा न बळगात त्यांनी आपली पद्धत सुरूच ठेवली होती. अखेर आज त्यांनी मंत्रालयात समक्ष भेट दिली.