अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजप अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची मंगळवारी निवड झाली. भाजपने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
निवडीपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी केली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे शेळके यांच्या नावाची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. याच सत्यजित तांबे यांना दहा वर्ष जिल्हापरिषदेत कॉंग्रेसकडून निवडून येवून व कॉंग्रेसकडे बहुमत असतानांही विखे पाटील यांनी अध्यक्षपदापासून दूर ठेवत पत्नी शालिनीताई विखे यांना निवडून आणले होते.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
२००७ साली सत्यजित तांबे यांचे वय २४ होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत ते काँग्रेसचे जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाल्यानंतर बहुतांशी सदस्यांची इच्छा सत्यजित तांबे यांनी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनाच अध्यक्ष केले.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
बऱ्याच ओढाताणी नंतर यांना सव्वा वर्षे व विखे यांना सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. तांबे यांनी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण सत्यजित तांबे लहान असल्याने शालिनीताई विखे याच पहिल्यांदा अध्यक्ष झाल्या, पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने सत्यजित तांबे यांचा पराभव केला.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
जिल्हा परिषदेत दोन टर्म राहूनही सत्यजित तांबे यांचे अहमदनगर जिल्हापरिषद अध्यक्षपदाचे स्वप्न विखे पाटलांनी पूर्ण होवू दिले नाही मात्र त्याच सत्यजित तांबे यांनी 2020 साली 13 वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत महाविकास आघाडीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावत विखे पाटलांना सत्तेपासून दूर ठेवले.
हे पण वाचा : अमेरिकेत उच्च शिक्षण ते पहिल्याच टर्ममध्ये मंत्री… जाणून घ्या नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल ही माहिती
दरम्यान या निवडणुकी नंतर तांबे समर्थकांनी सोशल मिडीयावर ”समय बडा बलवान होता है ! ज्या जिल्हापरिषदेत अध्यक्षपदासाठी नितीमत्ता सोडून डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले” अशी एक पोस्ट लिहित भावना मोकळ्या केल्या.