अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2022 Krushi news :-जगात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. भारतात सुद्धा पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. भारतात अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेती समवेतचं शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते.
पशुपालनात (Animal Husbandry) सर्वात जास्त म्हशीचे पालन (Buffalo rearing) देशात बघायला मिळते हेच कारण आहे की देशात सर्वात जास्त म्हशींची संख्या असल्याचे सांगितले जाते.
आपल्या देशात म्हैस पालन इतर पशुपालनाच्या तुलनेत सर्वात अधिक केले जाते. भारतात एकूण दुग्धोत्पादनापैकी 49 टक्के दूध फक्त म्हशींपासून मिळते.
यामुळे आज आपण याचे महत्त्व ओळखून सर्वात जास्त दूध देणाऱ्या म्हशीची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया म्हशीच्या सुधारित आणि अधिक दुग्धोत्पादन असलेल्या म्हशीच्या जाती.
मुऱ्हा म्हैस मुऱ्हा ही एक म्हशीची उत्कृष्ट जात आहे. म्हणुन या यादीत पहिला क्रमांक येतो तो मुर्राह जातीच्या म्हशीचा. या जातीच्या म्हशीचे दुग्ध उत्पादनासाठी अधिक पालन केले जाते.
ही एक दुभती जात मानली जाते. वर्षभरात ही म्हैस एक ते तीन हजार लिटर दूध देण्यास सक्षम असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करतात.
मुऱ्हा म्हशीच्या दुधात सुमारे 9 टक्के फॅट आढळत असल्याचे सांगितले जाते. चांगल्या दुधाच्या उत्पादनासाठी मुऱ्हा म्हशीच्या खुराकाची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे.
मेहसाणा म्हैस ही देखील म्हशीची एक प्रगत जात आहे. या जातीच्या म्हशी मुख्यतः गुजरात आणि आपल्या राज्यात अधिक प्रमाणात पाळल्या जातात.
या म्हशीची सरासरी दूध उत्पादन क्षमता 1200 ते 1500 लिटर प्रति वर्ष असल्याचे जाणकार लोक सांगतात, ही जात जास्त दूध देण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
ही म्हैस तिच्या शांत स्वभावासाठीही ओळखली जाते. यामुळे या म्हशीचे पालन आपल्या राज्यासाठी बघायला मिळते.
पंढरपुरी म्हैस मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही जात मूळची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातली यामुळे या जातीला पंढरपुरी म्हैस म्हणून संबोधले जाते.
पंढरपुरी म्हैस आता परराज्यात देखील पाळले जाते मात्र असे असले तरी मुख्यतः या म्हशीचे सर्वात जास्त पालन महाराष्ट्रातच बघायला मिळते. महाराष्ट्रातील वातावरण या म्हशीसाठी खूपच अनुकूल असल्याने या जातीच्या म्हशीचे संगोपन महाराष्ट्रात अधिक असल्याचे जाणकार सांगतात.
पंढरपुरी म्हशीच्या दुधात ८ टक्के फॅट आढळत असल्याचे सांगितले जाते. म्हशीची ही देशी जातं 1700 ते 1800 लिटर एका वेताला दुध देत असते.