राज ठाकरेंच्या सभेसाठी अशा असतील पोलिसांच्या अटी-शर्ती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022  Maharashtra news :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

आज दुपारी यासंबंधी अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र परवानगी देताना काही अटी आणि शर्ती घातल्या जाणार आहेत.p

अशा असतील अटी-शर्थी

-ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे

– लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

– इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

– सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

-१ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

– व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

-सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे

-सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

-सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

-सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News