अहमदनगर जिल्हा हादरला ! पतीनेच पत्नीवर घातले कुऱ्हाडीने घाव…या तालुक्यातील धक्कादायक घटना…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Crime: भारतीय संस्कृतीत पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे मानले जाते. पतीवर आलेल्या संकटास ढाल बनून पत्नीने पतीचे रक्षण केल्याच्या देखील अनेक कथा आपण ऐकल्या आहेत.

मात्र दुसरीकडे घरगुती कारणावरून पतीनेच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

संगीता रोहीदास पंदरकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपी पती स्वत: पोलिसात हजर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव विसापूर रस्त्यावरील पंदरकर मळ्याच्या शिवारात रोहिदास पंदरकर आपल्या पत्नी मुलांसोबत सोबत वास्तव्यास होते.

शनिवारी पहाटेेच्या सुमारास रोहिदास पंदरकर याने पत्नी संगीता पंदरकर हिच्या गळ्यावर धारदार कुऱ्हाडीने घाव घातला त्यात संगीता पंदरकर गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसाचे पोलिस पाटील सुनील शिवणकर यांनी बेलवंडी पोलिसांना सदरील घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पत्नीचा खून करणारा रोहिदास पंदरकर याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्याच्यावर गेल्या काही वर्षांपासून उपचार सुरू असल्याने औषध गोळ्या सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe