अहमदनगर लाईव्ह 24 टीम अहमदनगर : शहरातील सावेडी भागातील गुलमोहर रोड येथील अपार्टमेट मध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा अड्डाच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय.
आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके नगर शहर विभाग तसेच पोलिस निरीक्षक विकास वाघ , पोलीस हवालदार निपसे ,पोलीस नाईक मिरपगार , पोलीस नाईक फसले ,पोलीस कॉन्स्टेबल लहारे, खरात , महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, भगत , सुद्रीक यांचे टीमने गुलमोहर रोड वरील अपार्टमेंट मध्ये छापा टाकला.
अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 01 परप्रांतीय मुलीची सुटका करून कुंटणखाना चालवणारे १) अमर उर्फ़ विकी गोपालदास सोळुखे याचेवर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे तोफखाना पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करणेचे काम चालू आहे.