Farming Business Idea : भेंडीची शास्त्रीय शेती म्हणजेच उत्पन्नाची हमी; वाचा याविषयी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Farming Business Idea :- आपल्या देशातील अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करतात. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) लागवड करत असतात.

या भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये भेंडी (Ladies Finger) ही भाजी खूप लोकप्रिय आहे. भाज्यांच्या यादीत भेंडीचे महत्व अधिक आहे यामुळे शेतकरी बांधव देखील भेंडीची लागवड (Okra cultivation) मोठ्या प्रमाणात करत असतात.

याला इंग्रजीत लेडीज फिंगर आणि ओक्रा असेही म्हणतात. उन्हाळ्यात भेंडीची बाजारात मागणी अधिक असते आणि यामुळे याला किंमत देखील अधिक मिळतं असते. यामुळे आज आपण भेंडीची शेती (Okra farming) कशा पद्धतीने केली जाते याविषयी जाणून घेणार आहोत.

भेंडी लागवडीसाठी योग्य हवामान नेमकं कसं आवश्यक असत बरं
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याच्या लागवडीसाठी उष्ण आणि ओलसर हवामान आवश्यक असते.

कृषी वैज्ञानिकांच्या मते, याच्या बिया अंकुरण पावण्यासाठी सुमारे 20 ते 25 अंश सेंटीग्रेड तापमान आवश्यक असते. मित्रांनो उन्हाळ्यात 42 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान भेंडी पिकासाठी खुपच घातक सिद्ध होते, कारण अशा वेळी त्याची फुले गळायला लागतात. त्यामुळे याचा थेट परिणाम उत्पन्नावर होतो.

भिंडी लागवडीसाठी योग्य जमीन कशी असायला हवी बरं
भेंडीच्या शेतीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड केली जाऊ शकते, परंतु यासाठी हलकी चिकणमाती असलेली जमीन अतिशय चांगली मानली जाते.

कारण की या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. याशिवाय त्याच्या लागवडीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ असणे अत्यंत आवश्यक आहे.

यासह, जमिनीचे pH मूल्य सुमारे 6 ते 6.8 असावे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांनी शेती करण्यापूर्वी एकदा माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून नंतर या पिकांची शेती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि यातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होईल.

भेंडी पिकासाठी पूर्वमशागत नेमकी कशी करावी बरं
भेंडी पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागत करताना शेतकऱ्यानी प्रथम शेताची 2 ते 3 वेळा चांगली मशागत करावी. यासोबतच शेतजमीन बारीक करून त्यावर फाळ चालवावा, म्हणजे शेत चांगले समतल होईल.

लेडीज फिंगर लागवडीसाठी सुधारित वाण तरी नेमके कोणते
आजकाल, भेंडीच्या अनेक प्रकारच्या सुधारित जाती कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केल्या आहेत. या वाणांची लागवड करून शेतकरी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतात.

शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामान व माती यानुसार लेडीज फिंगरचे वाण निवडावे. असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना देत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe