अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story :-मित्रांनो असे सांगितलं जातं की, कठोर परिश्रम केल्यामुळे प्रत्येक कामात यश हे ठरलेलंच असते. अथक परिश्रम हिच यशाची गुरुकुल्ली आहे, ही म्हण आपण नेहमी ऐकत असतो आणि तसं करण्याचा प्रयत्न देखील करतो.
आज आपण राजस्थान मधील अशाच एका व्यक्तीबद्दल जाणुन घेणार आहोत, ज्याने आपल्या संघर्षातून नेत्रदीपक यश मिळवले.
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर तहसील मध्ये राहणाऱ्या सोहनलाल निथरवाल यांच्या संघर्षाची ही कहाणी आहे. आपल्या वडिलांचा संघर्ष पाहता सोहनलाल यांनी यूपीएससी परीक्षेत 201 वा क्रमांक मिळविला आणि ते आयएएस अधिकारी बनले.
सोहनलाल सांगतात की, त्यांचे वडील धान्य मार्केटमध्ये मजुरी करणारे आणि भुडीच्या धानी ढलयावाड्यात शेती करणारे साधेसुधे व्यक्ती आहेत. पण तरीही त्यांनी मुलांचे उच्च शिक्षणाचे (Education) स्वप्न पूर्ण केले आहे.
अशी केली शिक्षणाला सुरवात
आयएएस (IAS Officer) सोहनलाल सांगतात की, त्यांनी त्यांच्या गावातील सरकारी शाळेतून शिक्षणाला सुरुवात केली. गावातील शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर सीकरला जाऊन विज्ञान विषय घेऊन बारावीचे शिक्षण घेतले.
त्यानंतर 2016 मध्ये त्याने आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकमधून बीटेक पूर्ण केले. यानंतर मेहनतीच्या जोरावर 2018 साली त्यांनी अभियांत्रिकी सेवा म्हणून कामाला सुरवात केली.
मात्र त्यांना प्रशासकीय अधिकारी बनायचे होते. त्यासाठी तो प्रयत्न करत होता, अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि अखेर 2019 मध्ये, सततच्या प्रयत्नांनी, त्याने तिसऱ्या प्रयत्नात 201 व्या क्रमांकावरून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. 2020 मध्ये, IAS सोहनलाल यांची राजस्थान केडरमध्ये नियुक्ती झाली.
आयएएस झाले मात्र शेतीचा मोह काही सुटत नाही
आज जरी सोहनलाल आयएएस अधिकारी झाले असले, तरी देखील जेव्हा ते आपल्या गावी जातात तेव्हा ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असतात.
खरं पाहिलं तर आयएएस सोहनलाल हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, सध्या IAS सोहनलाल जोधपूर जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहेत.
पीएम मोदींनी देखील केले कौतुक
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनीही सोहनलाल यांच्या कष्टाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मित्रांनो महामारीच्या काळात, यूपीसह इतर अनेक राज्यांतील कामगार आणि अधिकाऱ्यांनी मिळून पलसाणा येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये चांगली शाळा बनवली आहे. या लोकांच्या या उपक्रमाचे मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी भरभरून कौतुक केले.