मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) पक्षातील नेते सतत शिवसेनेला (Shivsena) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचताना दिसत आहेत. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.
आमदार राजू पाटील म्हणाले, स्वतःचा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या (Sharad Pawar) पायाशी नेऊन ठेवला, तेव्हा आम्ही बोलायचं का यांनी फोटोग्राफरचा गळा घोटला? अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

संजय राऊतांना काही काम धंदे नाहीत. त्यांनी एकांतात भाष्य किंवा बडबड करण्याची सवय लावून घ्यावी, असं राज ठाकरेच मागे बोलले आहेत. त्यामुळे ते यांची प्रॅक्टिस करत असावेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी अगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, बाळासाहेब ठाकरे हे आधी प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेबांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले.
त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रकला पुढे जाईल, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे. असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
कोणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेला फरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुंनादेखील त्रास होत असल्याने लाखो हिंदुंनी नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे राज यांनी सुरू केलंलं मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण हिंदुंच्याच गळ्याशी आलं असल्याचेही संजय राऊत म्हणाले होते.