अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वातावरण तापत चालले आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होत आसल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा :- सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश
ही लढत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि श्रीगोंदे-नगरचे आमदार बबनराव पाचपुते या दोन गटांत होत आहे. आमदार अरुण जगताप यांच्या समर्थकांना दोन्ही पॅनेलकडून उमेदवारी डावलण्यात आली आहे.
हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !
जिल्हा परिषद गटातील मांडवगण हे सर्वात मोठे गाव असून येथील ग्रामपंचायतची निवडणूक ९ जानेवारीला आहे. सरपंच पद सलग दुसऱ्यांदा अनुसूचित जातीच्या महिलेकरिता आरक्षित आहे.
हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही पॅनेलच्या उमेदवाऱ्या निश्चित झाल्या. दोन्ही उमेदवार भाजपला मानणारे असल्याने लढत भाजपच्या दोन गटांत होऊन सरपंच भाजपचाच होणार हे निश्चित आहे.
हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?
सरपंचपदासाठी काट्याची टक्कर आहे. मजूर फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, डी. डी. घोरपडे आणि पं. स. सदस्य सिद्धेश्वर देशमुख, झुंबरराव बोरुडे ही दोन पॅनेल आमने-सामने मैदानात उतरली आहेत.
हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !
बोरुडे-घोरपडे यांच्या गटाकडून पाचपुते समर्थक विद्यमान सरपंच अर्चना प्रताप चव्हाण, तर देशमुख-बोरुडे गटाकडून विखे समर्थक सुलभा चंद्रकांत सदाफुले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.