Ahmednagar Crime : संदीप भांबरकर मारहाण प्रकरणी ह्या 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Crime : शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्ह करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर (वय 35 रा. टांगे गल्ली, अहमदनगर) यांना तलवारीचा धाक दाखवून मोबाईल काढून घेत मारहाण करण्यात आली. मित्राला पाहण्यासाठी तोफखाना येथे गेल्यानंतर ही घटना घडली.

शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी भांबरकर यांनी फिर्याद दिली आहे.

राजू जाधव, पांढरे, नन्या दौंडकर, राजू जाधव याचा मोठा मुलगा अभिमन्यू, जाधव याचा लहान मुलगा (नाव माहिती नाही) यांच्यासह इतर पाच ते सात जणांविरोधात आर्म अ‍ॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांबरकर हे त्यांच्या मित्राला पाहण्यासाठी गेले असताना आरोपीने त्यांना अडवून त्यांच्या गळ्यातील चेन ओढली. मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत मारहाण केली. कपडे फाडले व तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe