मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, नितेश राणेंचा अजब दावा

Published on -

मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष (Political party) मैदानात उतरले आहेत. तसेच मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) काबीज करण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत.

अशातच आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार असा दावा केला असून त्यांनी शिवसेनेला पुन्हा टार्गेट केले आहे.

नितेश राणे म्हणाले, हिंदुत्व आणि शिवसेना काही संबंध राहिला नाही. आता बॅनर लावले आहेत. त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागत आहे, लोकांना सांगावं लागत आहे. १४ मे ला सभा होणार आहे. इतके टोमणे ऐकायला मिळणार आहेत की कानातून रक्त येणार आहे’, असा जोरदार टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे.

तसेच आपण ज्या शिवसेनेवर (Shivsena) प्रेम करायचो ती शिवसेना आता राहिली नाही. आता फक्त ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, जिकडे फक्त प्रॉफिट आणि लॉस मोजला जातोय.

जुन्या शिवसैनिकांना काही दिलं का? सुधीर जोशी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या घरातील लोकांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. पण त्या संजय राऊतांना नवाब मलिक यांच्या घरच्यांना भेटण्यासाठी वेळ आहे, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

त्याचसोबत त्यांच्याकडे आता टोमणे मारणं एवढंच काम सुरु आहे. भाजप (Bjp) नेत्यांना पोलिसांमार्फत टार्गेट केलं जातं आहे. आम्ही गप्प बसणारे लोक नाही. आरे ला कारे करणारे कार्यकर्ते आमचे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा थेट इशाराही नितेश राणेंनी दिला यावेळी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe