Indian Army : भारतीय सैन्यात भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. इंजिनीअरिंग क्षेत्राशी निगडित तरुणांना सैन्यात भरती होण्याची ही उत्तम संधी आहे. सैन्याने तांत्रिक पदवी (Technical degree) अभ्यासक्रमासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, त्यामधे 40 रिक्त जागा बाहेर आल्या आहेत.
इंडियन आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स फॉर पर्मनंट कमिशन (Indian Army Technical Graduate Course for Permanent Commission) साठी भारतीय सैन्यात जानेवारी 2023 पासून इंडियन मिलिटरी अकादमी (ndian Military Academy) डेहराडून (Dehradun) येथे सुरू होईल. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून आहे.

अभियांत्रिकीच्या या क्षेत्रांमध्ये रिक्त जागा –
सिव्हिल – 09
आर्किटेक्चर – 01
यांत्रिक – 06
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 03
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान / एमएससी संगणक विज्ञान – 08
आयटी – 03
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार – 01
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन – 03
एरोनॉटिकल/ एरोस्पेस – ०१
इलेक्ट्रॉनिक्स – ०१
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन – 01
उत्पादन – 01
औद्योगिक / उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन – 01
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – 01
आवश्यक पात्रता –
या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी पदवी (Degree in engineering) असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, परंतु अशा उमेदवारांनी 01 जानेवारी 2023 पर्यंत अभियांत्रिकी पदवी संपादन केलेली असावी.
वयोमर्यादा आणि अर्ज फी –
उमेदवाराची वयोमर्यादा 20 ते 27 वर्षे असावी. या कोर्ससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड पीईटी, एसएसबी मुलाखत (SSB interview) आणि वैद्यकीय परीक्षेवर आधारित असेल.
वेतन माहिती –
भारतीय लष्कराच्या 136 व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाच्या भर्ती अंतर्गत, पगार 56 हजार ते 1.77 लाख रुपये प्रति महिना असू शकतो.
अर्ज कसा करावा –
पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे 09 जून 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.