राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होणार? आजच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता त्यांचा हा दौरा स्थगित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरेंचा दौरा जर स्थगित झाला, तर त्याचा उहापोह राज ठाकरेंच्या पुण्यातील (Pune) सभेतून केला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्यी अयोध्या दौऱ्याच्या तयारीला पुरेसा वेगही आलेला नव्हता.

रेल्वेचं आरक्षणही झालेलं नव्हतं. तसेच अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ५ जूनला दौरा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे.

तर राज ठाकरे यांची पुण्यात २२ तारखेला सभा होणार आहे. त्या सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे स्पष्ट भूमिका मांडण्याचीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप (Bjp) खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केलेला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

राज ठाकरेंनी याआधी केलेल्या आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केला असल्याचे आरोप बृजभूषण सिंह यांनी केल्यानंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) अधिकच चर्चेत आला होता.