Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

Sarkari Yojana Information : १० वर्षावरील मुलांसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ खास योजना, होईल २५०० रूपांची कमाई

Friday, May 20, 2022, 5:42 PM by Ahilyanagarlive24 Office

Sarkari Yojana Information : मुलं जन्मल्यापासून त्यांच्या पाल्यांना मुलाच्या भविष्याची चिंता लागलेली असते. तसेच अनेक पाल्य आपल्या पाल्याच्या नावे बँकमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक (Investment) करून ठेवत असतात. मात्र अशा प्रकारे गुंतवणूक करूनही त्यांना योग्य प्रकारे व्याज मिळत नाही.

दरम्यान, पोस्ट ऑफिसची (Post Office) अशी भव्य योजना जी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरत आहे. पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस एमआयएस खाते योजना (Post Office MIS Account Scheme), जी एक हमी योजना आहे.

file photo

म्हणजेच, एकदा गुंतवणूक केली की, तुम्ही दर महिन्याला भरघोस व्याजाचा लाभ घेऊ शकता. या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी सुरक्षित खाते उघडले जाते. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

किती व्याज मिळेल

पोस्ट ऑफिस एमआयएस खात्याच्या लाभार्थीला सुमारे 6.6 टक्के व्याज दिले जाते. जर खातेदाराने 3.50 लाख रुपये गुंतवले तर त्याला दरमहा 1925 रुपये व्याज मिळेल आणि 2 लाख रुपये जमा केल्यास त्याला दरमहा 1100 रुपये मिळतील, एकूण पाच वर्षांत खातेदाराला सुमारे 66000 रुपये व्याज मिळेल.

गुंतवणूक रक्कम

पोस्ट ऑफिस MIS खात्यात किमान गुंतवणूक रक्कम रु 1000 आणि कमाल रु 4.5 लाख आहे.

खाते कसे उघडायचे

पोस्ट ऑफिस एमआयएस खात्यात खाते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.

अर्ज मागवल्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा. आतापर्यंत या प्रकारचे खाते उघडण्यासाठी ग्राहकांना कोणतीही ऑनलाइन सुविधा देण्यात आलेली नाही. पोस्ट ऑफिस बचत खाते अर्ज अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो.

Categories ताज्या बातम्या Tags Investment, Post office, Post Office MIS Account Scheme, Sarkari Yojana Information
Government Scheme : या सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार फ्री सोलर प्लांट; कसं ते घ्या जाणून
Ration Card : मोठी बातमी! तब्बल 1 कोटी 81 लाख लोकांचे रेशन कार्ड केले गेले बंद
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress