अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ शेतकर्यांना मिळावा, तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासद असणार्या व या योजनेचेे पात्र शेतकरी सभासदांचा आधार कार्डनंबर बँक खात्याशी लिंक करण्यासाठी जिल्हा बँकने पुढाकार घेतला आहे.
यासाठी आज रविवारी सुटीच्या दिवशी बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी याबाबत कळविले असून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्यांचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.
शेतकर्यांचे आधार कार्ड नंबर बँक खात्याशी लिंक करण्यासाठी तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक बरोबर आहे का, याची खात्री करण्यासाठी शेतकर्यांनी सोसायटीचे सचिव व जिल्हा बँकेच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आज बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा केवळ या कामाकरिता सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बँकेकडून कळविण्यात आले आहे.